रक्षाबंधन निमित्त शालेय विद्यार्थ्यांनी बनवल्या आकर्षक राख्या

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : श्री छत्रपती शिवाजी प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी राखी बनवण्याच्या विशेष कार्यशाळेचे आयोजन केले होते. प्राथमिक विभागाच्या मुलांनी यात उत्साहाने सहभाग घेतला. टाकाऊतून टिकाऊ राख्यांची निर्मिती करत विद्यार्थ्यांनी घरून आणलेले रंगीत कागद, लोकर, मणी, कुंदन, टिकल्या आणि पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करून अत्यंत आकर्षक राख्या तयार केल्या.

या उपक्रमात वैभवी सुरडकर, रामेश्वरी वानखेडे, राजनंदिनी नाकीरे, पुनम नाकिरे, वेदिका नाकिरे, श्रद्धा डमाळे, आदेश साळवे, रितेश शिंदे, समर्थ पंडित विद्यार्थ्यांनी सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेल्या राख्या एकमेकांना दाखवत आनंद साजरा केला. काही मुलांनी भारतीय जवानांसाठी आणि सामाजिक संदेश देणाऱ्या विशेष राख्याही बनवल्या.

माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक निशांत म्हस्के यांनी मुलांच्या या सुंदर कलेचे कौतुक केले. बाजारातील महागड्या राख्यांपेक्षा स्वतःच्या हाताने बनवलेल्या राखीमध्ये जास्त जिव्हाळा असतो, असे प्रतिपादन प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गजानन डमाळे त्यांनी केले.